स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पुणे:- आगामी कार्यक्रमांच्या अनुषंगाने पुण्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.आगामि नववर्ष,1जानेवारी विजय स्तंभ अभिवादन आणि राजकीय मागण्या,मोर्चे याला अनुसरून पुणे ग्रामीण जिल्ह्यात जिल्हाधिकार्यानी 7 जानेवारीपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न उभ्दवू नये यासाठी निर्बंध लागू केले आहेत.पुणे ग्रामीण जिल्ह्यात जिल्हाधिकार्यानी 7 जानेवारीपर्यंत महाराष्ट्र पोलीस कायदा 1951ची कलम 37 1व 3 चे आदेशान्वये निर्बंध लागू करण्यात आयले आहे.हे निर्बंध पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये 26 डिसेंबर 2022 रोजी रात्री 12.05 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत. लागू राहणार आहेत.पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्या पत्रानुसार पुणे ग्रामीण जिल्ह्यात विविध मागण्यासाठी पक्ष व संघटनांकडून आंदोलन , रॅली , मोर्चे, निदर्शने इत्यादीचे आयोजन केले जात आहे.1.जानेवारी2023रोजी लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतील मोठ्या संख्येने अनुयायी विजय स्तंभास मानवंदना कार्यक्रम साजरा करण्यासाठी येत असतात वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य कृतीसाठी सत्यार्थ बाळगणे आवश्यक आहे.त्याना लागू होणार नाही.तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस कायदा 1951चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल ,असे पोलिसांनी म्हंटले आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.