www.starmazanews.comपुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:-सकल हिंदू समाज समन्वय समिती पिंपरी चिंचवडच्या वतीने चिंचवड येथील महावीर चौकातुन विराट जनगर्जना मोर्च्याला सुरुवात झाली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानावर मोर्च्याचा समारोप करण्यात आला.गोहत्या,लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाजा तर्फे हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पिंपरी चिंचवड शहरातील अनेक विध संघटनांसह सकल हिंदू समाज सहभागी झाल्या आहेत.त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे.हा मोर्चा मुंबई पुणे महामार्गाच्या सर्व्हिस रोडने पायी जात असल्याने हायवे घ्या सर्व्हिस रोड वरुन वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. समारोप सभेत स्वरुपा भोईने म्हंटले की धर्मांतर हे कुणाला फुस लावुन, कुणाला बळजबरीने केले जाते ,तर १० वर्षात हिंदूंची संख्या पाच टक्क्यांनी घटत आहे.त्याचे कारण त्यांचे पहिल्यापासून धोरण आहे.कि हिंदू बटा तो देश घटा त्याचे बीजवंत उदाहरण काश्मीर फाइल्स आहे.हे संघटन आपल्या टाळायचे आहे.आपण जशी सती जायची परंपरा मोडीत काढली.बालविवाह परंपरांची मुळे मोडीत काढली,तर आम्हाला सरकारला आवाहन करायचे आहे.की धर्मांतर मोडीत काढा, गोहत्या, लव्ह जिहाद मोडीत काढा.सगळ्या मुलींना आह्वान आहे.कि प्रेम करा पण डोळसपणे करा.डोळे उघडे ठेवून करा त्यामुळे जे आपल्यावर धर्मांतरणाचे संकट आले ते आपण टाळू शकू त्या पुढे म्हणाले की की कुठलाही मिशनरी गोडगोड बोलून धर्मांतर करायला आले.जोपर्यंत तुम्ही आम्ही आहोत आणि महाराष्ट्रत प्रत्येक मंदिरात टाळ वाजतोय तोपर्यंत हिंदू धर्म कधीही संपू शकत नाही.एवढी हिंदू धर्मांची ताकद आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.