खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारकऱ्यांना स्वेटर, साडी, कापडी पिशव्या व फळे वाटप

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी: -मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सदगुरु नारायण महाराज श्री क्षेत्र नारायणपूर यांच्या अधिपत्याखाली निघालेल्या अलिबाग ते क्षेत्र नारायणपूर पायी दिंडीतील वारकऱ्यांना स्वेटर, साडी, कापडी पिशव्या व फळे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेवका चंदाताई लोखंडे, अरुण पवार यांच्या हस्ते पुरुष वारकऱ्यांना स्वेटर, महीला वारकऱ्यांना साडी व पर्यावरणपूरक कापडी पिशव्या व फळांचे वाटत करण्यात आले.यावेळी दत्त सेवेकरी चंद्रकांत रासकर,गोपाळ कांबळे, अनंत लिंबोटे ,महादेव खंडागळे, बालाजी होणार,माजी नगरसेवक राजू लोखंडे, शंकर जगताप, सामाजिक कार्यकर्ते गोपि पवार आदी उपस्थित होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!