बार्शीमध्ये विठ्ठलनगर येथे श्री संत भगवानबाबा सभामंडप बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न..

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898


आचार्य स्वामी नारायण महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते व बार्शीचे आमदार मा.राजाभाऊ राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि.२७/१०/२०२२ वार गुरुवार रोजी विठ्ठलनगर येथे पार पडला.
बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपल्या मनोगतात स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांवर असणारी श्रद्धा व वंजारी समाजावर असणारे प्रेम मला वेगळीच उर्जा देत असते.आपण राजकारणात आल्यापासून बार्शी तालुक्यातील वंजारी समाज बांधव मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी उभा रहात आलेला आहे. शहराच्या ठिकाणी समाजाला एकत्र येण्यासाठी तसेच गोरगरीबांचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी छोटेसे सभागृह असणं गरजेचे आहे अशी मागणी वारंवार होतं होती त्यामुळे वंजारी समाज बांधवांसाठी श्री संत भगवानबाबा सभामंडप बांधकाम करण्यासाठी आपण आमदार फंडातून वीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. तसेच कंपाऊंड भिंत बांधण्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपये अगाऊ देण्याचे आश्वासन यावेळी दिले. आपण शेतकऱ्यांसाठी तर नेहमीच काम करत असतो परंतु सर्व समाजाला एकत्र घेऊन पुढे जाणंही आवश्यक असते त्यामुळे बार्शी शहरात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्याठिकाणी आपण आमदार फंडातून निधी उपलब्ध करून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे समाजहिताचे कार्य करत असतो असे परखडपणे सांगितले.


तसेच आचार्य स्वामी नारायण महाराज शास्त्री यांनी श्री संत भगवानबाबा यांची सर्व दूर पसरलेली ख्याती अत्यंत विस्तृतपणे मांडली. बार्शी तालुक्याचे आमदार शेतकऱ्यांसाठी खूप काम करतात त्याबद्दल आमदारांचे विशेष आभार मानले. आमदार सर्व समाजाला एकत्र येण्यासाठी शहरात विविध ठिकाणी समाजमंदिर उभारण्यासाठी आपला आमदार फंडाचा निधी उपलब्ध करून देतात यावरुन त्यांचा दूरदृष्टीकोन लक्षात येतो. असा नेता टिकला पाहिजे व आपण टिकवला पाहिजे त्यासाठी सर्व वंजारी समाज बांधवांनी अशा लोकसेवकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच आमदारांना पुढील लोकोपयोगी कार्यासाठी उत्तमोत्तम आरोग्य लाभो, कार्यकुशल विचार मिळो अशी श्री संत भगवानबाबा चरणी प्रार्थना केली.
यावेळी मा.सुभाष जाधवर वकील साहेब, नायब तहसीलदार संजीवन मुंडे साहेब, जि. प. सदस्य मदन दराडे सर, रावसाहेब जाधवर सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.*


*कार्यक्रमाचे प्रास्ताविक कालिदास दराडे पाटील सर, सूत्रसंचालन दिलीप घोळवे सर, आभारप्रदर्शन अतुल खाडे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक संदेश काकडे, पिंटू यादव, अरुण ढाकणे,राहुल मुंडे, आबा ढाकणे, गणेश मुंढे, विक्रम जाधवर, श्रीमंत घुले, कल्याण तोगे, श्रीराम मुंडे, किशोर जाधवर, भीमराव दराडे, खुशाल मुंढे, दिपक मुंडे, श्रीरंग ढाकणे तात्या वाघ, अरुण ढाकणे, अशोक मुंढे, अमर घुगे, लक्ष्मण जाधवर, सुनील सानप, सचिन सोनवणे, पद्माकर मंडे, सुमंत जाधवर तसेच बार्शी तालुक्यातील समस्त वंजारी समाजाने परिश्रम घेतले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!