www.starmazanews.com संपादक:- रियाज पठाण 9405749898/9408749898
बार्शी – शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने माध्यमिक शालांत परीक्षा 2021 -2022 मध्ये 90% पेक्षा अधिक मार्क्स घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संत तुकाराम सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्री. बी. वाय. यादव यांनी भूषविले. संस्थेचे सचिव श्री. पी. टी. पाटील, संस्थेचे खजिनदा श्री जयकुमार ( बापू ) शितोळे संस्था सदस्य श्री प्राचार्य मोरे सर, संस्था सदस्य श्री बी. के भालके सर यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहोळा संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी श्री रावसाहेब मिरगणे सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी श्रीमती सुलभाताई वठारे मॅडम उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार श्री जयकुमार शितोळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक श्री किरण गाढवे यांनी करून दिला. इयत्ता दहावी मधील महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थिनी सलोनी खटाळ व अमन शेख यांनी मनोगत व्यक्त केले. पालकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य श्री. मदन दराडे सर, संतोष कुमार घावटे सर, श्री शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सचिव पी.टी .पाटील माननीय श्री रावसाहेब मिरगणे साहेब, श्रीमती सुलभा वठारे मॅडम, मा.डॉ.बी.वाय.यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संस्थेतील विविध शाखांमधील 117 विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह, पुष्प, व पाचशे रुपये रोख रक्कम देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संस्थेच्या सर्व शाखांमधून प्रथम एक ते पाच विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर यादव यांच्या वतीने प्रत्येकी एक हजार रुपये रोख रक्कम देऊन सात विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार प्राचार्य श्री जी. ए. चव्हाण सर यांनी मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ए. एन. कसबे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व संस्थेतील सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. आर. बी. सपताळे सर, इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.