जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करा- PSI सौ कविता मुसळे.

Picture of starmazanews

starmazanews

starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करा- पोलीस उपनिरीक्षक सौ कविता मुसळे.
( रा गे शिंदे महाविद्यालयात पोलीस उपनिरीक्षक कविता मुसळे यांनी केले मार्गदर्शन)

परांडा दि. 5 जुलै 2022 विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे असे मत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या अँटी रॅगिंग विभागाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ दीपा सावळे या उपस्थित होत्या तर व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, पोलीस नाईक आर एन शिंदे, पोलीस नाईक एस एस शेवाळे, पोलीस कॉन्स्टेबल जीआर मोठेगावकर आधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक मुसळे म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांच्या कष्टाचा विचार करून त्याची जाणीव ठेवावी. एखादा गुन्हा घडल्यास पुढील यशस्वी जीवनासाठी अनेक अडथळे निर्माण होतात त्यामुळे छेडछाड करणे अँटी रॅगिंग करणे यासारखे गुन्हे दाखल झाल्यास विद्यार्थ्यांना नोकरीसाठी व करिअर साठी सामोरे जावे लागते. पोलीस ठाणे हे समाजाच्या प्रगतीसाठी आहे. त्यामुळे समाजामध्ये गुन्हे होऊ नये भारतीय संविधानाने दिलेल्या कायद्याचं पालन करत सर्वांनी सामांजसपणाने राहिले पाहिजे. पुढे बोलताना म्हणाले की मोबाईलचा वापर काही मर्यादेपर्यंतच करावा. अमर्याद मोबाईल वापरामुळे वाईट परिणाम होतात. गरज असेल तरच मोबाईलचा वापर करा.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ दीपा सावळे म्हणाल्या की शाळा महाविद्यालय हे संस्काराचे केंद्र आहे .विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व यातूनच घडते. तेव्हा विद्यार्थ्यांनी समोर ध्येय समोर ठेवून जिद्दीने अभ्यास करून स्वतःचे आणि आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करावे. आपण समाजात वागत असताना अनेक प्रसंग येतात तेव्हा त्यांना न डगमगता आपण आपले ध्येय निश्चित करावे व जीवनात यशस्वी व्हावे. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा तानाजी फरतडे ,अरुण माने, धनंजय गायकवाड यांनी सहकार्य केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी मानले.

starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!