मा.आमदार राहुल भैया मोटे यांची 21 टीएमसी पाणी बाबत खा शरद पवार साहेब यांच्या बरोबर चर्चा.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने

*भूम-परंडा-वाशी चे माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब 21 टीएमसी पाणी बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या बरोबर चर्चा करताना*
आज दिनांक 6 मार्च 2000 22 रोजी *मौजे आकुबाई पाडोळी तालुका उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद* येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला प्रमुख उपस्थित *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब उपस्थित होते .* त्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करताना *भूम-परंडा-वाशी चे माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब यांनी 21* टीएमसी पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मागणी केली त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांना भ्रमणध्वनीद्वारे शरद चंद्रजी पवार साहेब यांनी फोन करून उस्मानाबाद जिल्ह्यासाठी येणाऱ्या 21 टीएमसी पाण्याच्या कामाबाबत विचारणा केली भूम-परंडा-वाशी साठी अतिशय महत्त्वाचा असणारा प्रश्न माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब यांनी पवार साहेबांना मार्गी लावण्याबाबत विनंती केली तो क्षण
त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व अर्थसाह्य मंत्री धनंजय मुंडे साहेब, उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्कमंत्री बनसोडे साहेब, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार,प्रदेश सरचिटणीस तथा एस पी शुगर चे चेअरमन सुरेश पाटील साहेब, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, प्रताप सिंह पाटील, संजय दुधगावकर, आठही तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, नगरसेवक, संचालक यांच्यासह लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!