स्टार माझा न्यूज, परंडा (प्रतिनिधी गोरख देशमाने) – दिनांक : २ एप्रिल २०२६.
दक्षिणमुखी काळ्या पाषाणातील हनुमान मूर्तीला पहाटेपासून गर्दी
परंडा शहरातील पुरातन भवानी शंकर मंदिरात चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवार, ता. २ एप्रिल रोजी पहाटेपासून महिलांसह नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिरातील दक्षिणमुखी अखंड काळ्या पाषाणातील चतुर्भुज हनुमान मूर्ती “काळा मारूती” म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे.
अभिषेक, पंचोपचार पूजा आणि सूर्योदयी आरतीने उत्सवाची सुरुवात
पहाटे विधीवत पंचोपचार, अभिषेक पूजा करण्यात आली. सूर्योदयी गुलाल उधळून सकाळी ६:३३ वाजता आरती करून उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
विश्वस्तांकडून प्रसादाचे वाटप
मंदीराचे विश्वस्त व पुजारी पं. किशोर बैरागी महाराज व कपिल बैरागी यांनी आरती करून भाविकांना लाडू, जिलेबी, पेढा आणि चणादाळ प्रसादाचे वाटप केले.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकुर, सुबोधसिंह ठाकुर, महाराष्ट्र चँपियन पै. आप्पा काशीद, सुनील शुक्ला, श्यामा मिश्रा, विशाल काशीद, संकेत ठाकुर, गोरख देशमाने, राजकुमार पाटील, सुरज ठाकुर, सुबोध देशमुख, विरेंद्रबाई काशीद, सागर काशीद, जयंन्त काशीद, राज वळसंगकर, गणेश देशमाने तसेच जेष्ठ गायिका सिंधूबाई शुक्ला यांसह नागरीक, महिला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धार्मिक वाचन कार्यक्रम अखंड सुरु
यावेळी हनुमान चालिसा, रामचरित्र, वीर हनुमान पुराण यांचे वाचन करण्यात आले. या मंदिरात अखंड “सुंदरकांड” पठणही सुरू आहे.
५ एप्रिल रोजी रथोत्सव
दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, ता. ५ एप्रिल रोजी लालमारुती मंदिर ते भवानी शंकर मंदिरापर्यंत भव्य मिरवणुकीने रथोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
रथमार्गावर भगवे झेंडे व पताका लावण्याची तयारी सुरू असल्याची माहिती विश्वस्त किशोर बैरागी यांनी दिली.
शिवकथापुराण सोहळा : ३१ मार्च ते ४ एप्रिल
काशीद मळा येथे ३१ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान शिवकथा पुराण सोहळा आयोजित असून भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरातील इतर मारुती मंदिरांमध्येही उत्सव
लाल मारुती मंदिर, समसमपुरा मारुती मंदिर, कुर्डुवाडी रोड येथील मारुती मंदिरातही हनुमान जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










