स्टार माझा न्यूज, परंडा (प्रतिनिधी) गोरख देशमाने परांडा – दिनांक : 18 जानेवारी 2026
🔸 पहाटे अभिषेक व आरतीने उत्सवाची सुरुवात
परंडा येथील ब्रह्मांडनायक देव
बाळूमामा मंदिरात अमावस्या निमित्त रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी भव्य भंडारा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. पहाटे श्रींचा अभिषेक होऊन आरती करण्यात आली. जय बाळूमामाच्या गजरात मंदिर परिसर भक्तीमय झाला.
🔸 भजनी मंडळांच्या भजनाने परिसर दुमदुमला
सकाळी 8 ते 11 या वेळेत पंचक्रोशीतील विविध महिला व पुरुष भजनी मंडळांच्या भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक भजन, अभंग व हरिपाठामुळे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.

🔸 हभप श्री नागेश महाराज मांजरे यांचे प्रेरणादायी कीर्तन
सकाळी 11 ते 12 या वेळेत हभप श्री नागेश महाराज मांजरे (भोंजा) यांचे सुसंस्कृत व विचारप्रवर्तक कीर्तन संपन्न झाले. कीर्तनानंतर अन्नदाते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
🔸 पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव
पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंदिराच्या वतीने पत्रकार बांधव व भगिनी यांचा फेटा, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल
पत्रकार आनंद खर्डेकर, सुरेश घाडगे, प्रमोद वेदपाठक, अविनाश ईटकर, मुजीब काझी, प्रशांत मिश्रा, गोरख देशमाने, नुरजा शेख, शहाजी कोकाटे, भजनदास गुडे, आप्पा शिंदे, किरण शिंदे
यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
🔸 वृक्षभेट देऊन अनोखा सन्मान
हभप श्री विजय महाराज खंडागळे (संगीत विशारद) व वसुंधरा परिवार यांच्या वतीने सर्व पत्रकार बांधव व भगिनींना वृक्षभेट देऊन पर्यावरणपूरक सन्मान करण्यात आला.
🔸 सेवाभावी देणगीदारांचे योगदान
या भंडारा उत्सवात
चहाचे नियोजन : श्री गणेशसिंह सद्दीवाल
कन्या आंबीलीचे नियोजन : श्री अनंतसिंह सद्दीवाल
महाप्रसाद अन्नदाते : श्री दत्तात्रय भगवान खंबायत, श्री दिलीप भगवान खंबायत
भाजीपाला व्यवस्था : श्री बाळासाहेब पाडुळे
खासापुरी पाणीजार व्यवस्था : ॲड. श्री भालचंद्र औसरे सर
यांचे मोलाचे योगदान लाभले.

🔸 शेकडो भाविकांची उपस्थिती
आरतीनंतर श्रींना नैवेद्य दाखवून सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास शेकडो भक्तगण उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्मांडनायक देव बाळूमामा मंदिर सर्व भक्त परिवार व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.
🔸 आभार प्रदर्शन
अन्नदाते, देणगीदार, भजनी मंडळे, कीर्तनकार मंडळ, मंदिर सेवेकरी व सर्व सहकार्य करणाऱ्या भक्तांचे मंदिर समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
जय बाळूमामा 🙏🙏
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.








