स्टार माझा न्यूज परंडा (प्रतिनिधी) गोरख देशमाने. परांडा येथील तहसील कार्यालय येथे दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक दिव्यांग दिन दिव्यांग बांधवांच्या समवेत तहसील कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला. परंतु नगरपरिषद कार्यालयमध्ये दिव्यांग दिन साजरा करण्यात आला नाही नगरपरिषद कार्यालयाला दिन्यांगाचा विसर विसर पडल्याचे दिसते नगरपरिषद कार्यलय वळगता इतर कार्यालयात दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.

यावेळी संजय गांधी विभाग प्रमुख नायब तहसीलदार सौ. पूजा गोरे यांनी दिव्यांग दिनाचे महत्त्व दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले तसेच परंडा तहसील कार्यालयामार्फत राबविण्यात आलेले उपक्रम यासंदर्भात माहिती सांगितली. तहसील कार्यालय परंडा पुरवठा विभाग मधील नायब तहसीलदार पुरवठा विभागामार्फत अन्नधान्य देण्यात येईल. ज्यांना रेशन कार्ड नाही अशांनी अर्ज करावे त्यांना अन्नधान्य रेशन कार्ड देण्यात येईल असे दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना सांगितले नायब तहसीलदार विजयकुमार बाडकर यांनी आमचे तहसील कार्यालय व प्रशासन दिव्यांग सेवेसाठी सदैव तत्पर राहील दिव्यांगाच्या सेवा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले.दिव्यांग उद्योग समूहाचे राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांनी दिव्यांग दिन व दिव्यांग बांधवांना येणाऱ्या समस्यांचा लेखाजोखा प्रशासन समोर मांडला .

परंडा तालुक्यात विविध ठिकाणी जागतिक दिव्यांग दिन गटशिक्षण कार्यालय, पंचायत समिती कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने दिव्यांग कल्याण विभाग सचिव तुकाराम मुंढे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करत होते संघटनेच्या या पाठपुराव्याला यश आले त्यानुसार तहसील कार्यालय येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके तालुकाप्रमुख तानाजी सांगळे दिव्यांग उद्योग समूहाचे प्रसिद्धी प्रमुख संतोष कुलकर्णी दादा माने, लाला गाढवे, व इतर सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय गांधी विभागातील भांडवलकर, तानाजी भोजने अण्णा मगर यांचे सहकार्य लाभले व हा जागतिक दिव्यांग दिन उत्साहात पार पडला.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










