मदत नव्हे, कर्तव्य! – कोंढापुरीतील सामाजिक कार्यकर्त्यांचा पूरग्रस्तांसाठी आदर्श उपक्रम
गाव: कोंढापुरी, तालुका: शिरूर, जि.: पुणे

सामाजिक जबाबदारीची संकल्पना
परंडा प्रतिनिधी दिनांक 13 ऑक्टोबर ,सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात मराठवाड्यातील भयानक पूरस्थिती पाहून 27 सप्टेंबर 2025 रोजी कोंढापुरी तालुका, शिरूर, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य अमर शेठ गायकवाड यांनी मदतीची संकल्पना मांडली.

मित्रमंडळींचा तत्पर प्रतिसाद
या आव्हानाला प्रतिसाद देत मित्रमंडळी विनयशेठ गायकवाड, स्वप्निलभैया गायकवाड, राहुलसाहेब गायकवाड, संतोषआबा गायकवाड, सागरदादा भोसले, सुधीरभाऊ गायकवाड, अशोकभाऊ गायकवाड, सुरेशशेठ गोगावले, अमोलशेठ गायकवाड आणि नितीन साहेब गायकवाड यांनी सोशल मीडियाद्वारे मित्र, नातेवाईक व नागरिकांना आव्हान दिले.
पहिल्या आठ तासातच ₹51,000 ची मदत जमा झाली आणि उत्साह वाढत गेला.

आवश्यक वस्तूंचे किट तयार
‘मदत नव्हे, कर्तव्य’ या भावनेतून 500 दैनंदिन उपयोगी किराणा वस्तूचे 20 किलो वजनाचे किट्स आणि 1000 शालेय साहित्याचे किट्स तयार केले.
दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी ट्रक्स कोंढापुरीहून रवाना झाले.

शिरसावसाठी विशेष प्रयत्न
शिरसाव या गावासाठी मदत मिळवण्यासाठी शिवसेनेचे विजय नवले आणि ग्रामपंचायत सदस्य रियाज पठाण यांनी पाठपुरावा केला. मदत पोहोचवण्यासाठी आसूचे ग्रामपंचायत सदस्य ताहेर पटेल यांच्या माध्यमातून किराणा मालाचे किट उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे शिरसावसाठी विशेष मदत सुनिश्चित झाली. यावेळी किट वाटप करताना मान्यवरांची उपस्थिती
वाटप कार्यक्रमात विजय नवले, ग्रामपंचायत सदस्य रियाज पठाण, अगतराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते अनंत जाधव, पांडुरंग पाटील यांसह गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

परांडा तालुक्यात मदत पोहोचवणे
पिंपरी-चिंचवड येथील उद्योजक मित्र योगेश शेठ गायकवाड आणि साजिदभाई पटेल (सानिया मोटर्स) यांच्या मार्गदर्शनाखाली परांडा तालुक्यातील खेडेगावांची निवड करण्यात आली.
दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी अमर शेठ गायकवाड आणि मित्रमंडळी स्वतः गावांमध्ये जाऊन मदत वितरीत केली.
सहकारी व ग्रामपंचायत सदस्यांचा सहभाग
मदत वितरणासाठी आसू ग्रामपंचायत सदस्य ताहेर पटेल, सरपंच सुजित जाधव, उपसरपंच शशिकांत पुणे, ग्रामपंचायत सदस्य श्रावण गणगे, रघुनाथ पाडे आणि सानिया डेअरीचे चेअरमन असद पटेल, झोंबाडे सर यांनी सहकार्य केले.

वाटपाचे तपशील
परंडा तालुक्यातील नांदगाव, शिरसाव, आसू, पिंपळवाडी येथील 500 अन्नधान्य किट (प्रति नग 20 किलो) वितरीत करण्यात आले. शालेय साहित्य जिल्हा परिषद शाळा नांलगाव, आसू, पिंपळवाडी, खासगाव, सोनगिरी येथे वाटप करण्यात आले. शिरसाव येथे अन्नधान्याचे 50 किट्स वाटप करताना ग्रामस्थ व पूरग्रस्त रहिवासी उपस्थित होते.

समाजासाठी धाडस आणि उदात्त भावना
ही मोहिम मदत नव्हे, कर्तव्य या भावनेतून उभी राहिली आणि सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण ठरली. स्थानिक नेते व ग्रामपंचायत सदस्यांचा सक्रिय सहभाग आदर्श ठरला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.