परंडा प्रतिनिधी : गोरख देशमाने
परंडा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट ओढवले असून त्यातून झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित दादा पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे नुकसान
माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये परंडा विधानसभेत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून पुरस्थिती निर्माण झाली. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मुग, उडीद, मका, ऊस तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारसमोर
अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत, पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई, तसेच विशेष अनुदान देण्याच्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत. रणजित दादा पाटील यांनी “मायबाप सरकार” म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावेळी मान्यवरांची उपस्थिती
या वेळी बाजार समिती संचालक शंकर जाधव, शहर प्रमुख रईस मुजावर, विभागप्रमुख रफिकभाई तांबोळी, पंत सुबुगडे, भाऊ सुबुगडे, अभय पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📞 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.