परंडा प्रतिनिधी – गोरख देशमाने.
येथील कल्याणसागर समूहातील सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, परंडा येथे स्टेट बँक ऑफ इंडिया, परंडा शाखेच्या वतीने ग्राहक सेवा केंद्र योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी बँकिंग जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांना बँक खात्यांचे महत्त्व पटवले
या कार्यक्रमात परंडा शाखेचे मॅनेजर श्री. प्रमोद जनबंधू यांनी विद्यार्थ्यांना शून्य शिल्लक रकमेवर बँक खाती उघडण्याची प्रक्रिया, डिजिटल व्यवहाराचे फायदे, बचतीचे महत्त्व, सुकन्या समृद्धी योजना यासह विविध बँकिंग सेवा याविषयी सविस्तर माहिती दिली.

मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन
कार्यक्रमात सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत पवार सर यांनी विद्यार्थ्यांना बँक व्यवहारांबद्दल मार्गदर्शन केले, तर कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. किरण गरड सर यांनी प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेचे बीज रोवले.
उपस्थित मान्यवर व सूत्रसंचालन
कार्यक्रमास श्री. विटकर साहेब, श्री. शेख साहेब हे बँक कर्मचारीही उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कल्याणसागर विद्यालयाचे सहशिक्षक श्री. अजित गव्हाणे यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.