स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने // शहाजी चंदनशिवे
परंडा दि. 21 जून 2025 श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग शारीरिक शिक्षण विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने तर प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते म्हणून उपजिल्हा रुग्णालय परांडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद मोरे तसेच समुपदेशक अमोल वांबुरकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले .

याप्रसंगी डॉ आनंद मोरे यांनी योगाचे महत्त्व तसेच आरोग्य टिकून राहण्यासाठी दररोज व्यायामाचे महत्त्व किती महत्त्वाचे आहे हे आपल्या व्याख्यानामध्ये सांगितले. प्रा तानाजी फरतडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी योगाचे विविध प्रकार त्यांनी करून दाखवले व सर्व उपस्थित विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी योग प्रात्यक्षिक केले. सास्कृतीक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभने व राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ अमर गोरेपाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा किरण देशमुख यांनी मानले.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.