बार्शीमध्ये मोठी दुर्घटना टळली!पावसामुळे कॅन्टीनचे छत कोसळले; तहसिलदारांच्या तत्परतेने पाच जणांचे प्राण वाचले!

Picture of starmazanews

starmazanews




घटनास्थळावर हडबडाट, पण प्रशासन सज्ज.
बार्शी प्रतिनिधी दिनांक २० मे २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता बार्शी तहसिल कार्यालयासमोरील श्री. डमरे कॅन्टीनवर अचानक मुसळधार पावसामुळे पत्र्याचे छत कोसळले. यामुळे तेथे उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही जण ढिगाऱ्याखाली अडकले होते.



तहसिलदार शेख यांचा धाडसी निर्णय; पावसातच बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच तहसिलदार मा. एफ.आर. शेख यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस, आरोग्य व नगरपरिषदेच्या यंत्रणांना अलर्ट करून स्वतः घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पावसातच बचाव कार्य सुरू करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले.




पाच जणांचा जीव वाचवण्यात यश; एक जखमी

तत्परतेमुळे पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र अर्जुन नागनाथ गवसाणे (वय ७६, सौंदरे) हे थोडे जखमी झाले असून त्यांना तातडीने जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

सुखरूप वाचलेले नागरिक:
१. विठल यल्लाप्पा गुंजाळ (६५), बार्शी
२. मालण हरिश्चंद्र ताकभाते (६५), श्रीपतपिंपरी
३. विजाबाई विठल गुंजाळ (६०), बार्शी
४. रेणुका दत्तात्रेय ताकभाते (४०), श्रीपतपिंपरी
५. दत्तात्रेय हरिश्चंद्र ताकभाते, श्रीपतपिंपरी




आपत्ती व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण!

या बचाव मोहिमेत नायब तहसिलदार सुभाष बदे, संदीप नालपे (आपत्ती व्यवस्थापन), पोलिस, नगरपरिषद व आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी टीमवर्कच्या जोरावर प्राण वाचवले. जेसिबीच्या साहाय्याने ढिगारा हटवण्यात आला आणि अजून कोणीही अडकलेले नसल्याची खात्री करण्यात आली.


तुरंत उपाययोजनांचे आदेश!

घटनेनंतर तहसिलदारांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना अशा धोकादायक ठिकाणांची तातडीने तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

ऐन  वेळी सज्ज प्रशासनाने दुर्घटना टळवली; नागरिकांतून कौतुकाची थेट प्रतिक्रिया

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!