गंगावणे यांच्या ” बाप ” या कवितेने गाजविले संमेलन .

Picture of starmazanews

starmazanews



परंडा  प्रतिनिधी गोरख देशमाने.परंडा   दि . १३ : – कराड येथे ३१ वे आखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन दि . ९ व १० मे रोजी पार पडले त्यात तुकाराम गंगावणे यांची ” बाप ” कविता गाजली . दि ११ मे रोजी अकलूज येथे आखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अधिवेशन पार पडले . अकलूज येथे झालेल्या कवि संमेलनाच्या अध्यक्ष मनीषा पाटील हेरोलीकर , उद्घाटक डॉ . सतीश तराळ राज्याध्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद , सुत्रसंचलन डॉ . सतीश होनगावे होते . परंडा येथील जेष्ठ साहित्यिक तुकाराम गंगावणे यांच्या ” बाप ” या कवितेने संमेलन गाजले . सहभागी कवी लक्ष्मण हेंबाडे , मनीषा पाटील रायजादे , सांगली , दिनेश भिसे परभणी , बालाजी जाधव लातूर , तानाजी राजे , शाहीर पाटील सांगली , दुर्गा देशमुख परभणी , राजेश महल्ले अमरावती , रवींद्र पांचाळ , शंकर कदम परभणी आदि सहभागी होते . यावेळी तुकाराम गंगावणे यांचा सन्मान चिन्ह व एक ग्रंथ देऊन सन्मान केला . गंगावणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!