स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
प्रतिनिधी | बार्शी | दि. १६
चंद्रपूर येथे होणाऱ्या प्रतिष्ठित अश्वमेध क्रीडा स्पर्धेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरचा मुला-मुलींचा बॅडमिंटन संघ रविवारी रवाना झाला. विशेष म्हणजे या स्पर्धेत मुलींच्या संघाचे नेतृत्व बार्शीच्या समृध्दी वायकुळे हिच्याकडे सोपवण्यात आले आहे.
बार्शीच्या सुलाखे कॉमर्स कॉलेज मध्ये शिकणारी समृध्दी वायकुळे ही बॅडमिंटनच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. तिच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीमुळे विद्यापीठाने तिला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.
तसेच, मुलांच्या संघाचे नेतृत्व बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयात शिकणारा खेळाडू अथर्व देशपांडे याच्याकडे देण्यात आले आहे. यामुळे बार्शीतील खेळाडूंनी पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
स्पर्धेचा कालावधी व विद्यापीठाच्या शुभेच्छा
अश्वमेध क्रीडा स्पर्धा १७ ते २२ फेब्रुवारी दरम्यान गोंडवाना विद्यापीठ, चंद्रपूर येथे होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, विद्यापीठ क्रीडा विभागाचे डॉ. अतुल लकडे, संघाचे व्यवस्थापक गणेश जोरवर आदींनी दोन्ही संघातील खेळाडूंना यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
संघाची रचना
मुलींचा बॅडमिंटन संघ:
समृध्दी वायकुळे (कर्णधार)
कोमल बनसोडे
प्रज्ञा पवार
साक्षी कुदळे
दिशा मोजेकर
पायल दमामी

मुलांचा बॅडमिंटन संघ:
अथर्व देशपांडे (कर्णधार)
हर्ष घारगे
सोजल रोकडे
समर्थ कुलकर्णी
अर्शद शेख
अथर्व घाडगे
संस्थांचे अभिनंदन व प्रोत्साहन
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाय. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, तसेच श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल शेख व कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय कारंडे यांनी दोन्ही खेळाडूंचे व संघाचे कौतुक केले आहे.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.