स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा पोलीस स्टेशन हद्दीत कारंजा व शिंगेवाडी-कुर्डुवाडी पोलीस ठाण्याच्या शिवारातील सिंना नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात या व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 50 वर्षे असल्याचे दिसून आले आहे. मृत व्यक्तीच्या उजव्या हातावर ‘ओम’ असे गोंदलेले असून, तो भगव्या रंगाचा गमचा डोक्याला बांधलेला आहे. त्याने लाल रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट घातली आहे असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सदरील व्यक्तीची दाढी पांढऱ्या रंगाची असून मृत्यूस सुमारे 7 ते 10 दिवस झाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासात नमूद केला आहे. मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण जात असल्याचे सांगण्यात आले.
परंडा पोलिसांनी जनतेला आवाहन केले की, जर आपल्या परिसरात वरील वर्णनाशी साधर्म्य असलेला कोणी व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असेल किंवा हरवल्याची तक्रार दाखल असेल, तर तात्काळ परंडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात यावा.
सदर मृतदेहाच्या ओळखीमुळे कुठल्याही बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबाला न्याय मिळू शकतो. त्यामुळे संबंधित माहिती असल्यास त्वरीत कळविण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
हा मृतदेह कसा आणि कशामुळे त्या ठिकाणी पोहोचला याचा तपास सध्या पोलीस यंत्रणा करत आहे. हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत अद्याप स्पष्टता नाही. घटनास्थळी अधिक चौकशीसाठी पोलिसांची टीम काम करीत आहे.
जनतेच्या सहकार्यामुळे या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे, असे मत पोलीस प्रशासनाने व्यक्त केली.
या संबंधि माहिती असल्यास परंडा पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.