स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा येथील शासकीय औद्योगिक संस्थेला कल्याण स्वामीचे नाव परंडा येथे भाजपा च्या वतीने भाजपा प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मानले महायुती
सरकारचे आभार परंडा ही संतांची भूमी असल्याने .महाविती सरकारनेपरंडा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला कल्याण स्वामी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आल्यानेपरंडा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
.
परंड्याच्या शासकीय आयटीआयला कल्याणस्वामी महाराजांचे नाव
भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी मानले महायुती सरकारचे आभार!
परंडा:- परंडा (जि. धाराशिव) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण “कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परंडा” असे केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व निविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांचे भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांनी आभार मानले आहेत.
याबाबत मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांनी सविस्तर माहिती देत म्हटले आहे की, कल्याण स्वामी हे समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य, योगी व समर्थांनी रचलेल्या “दासबोध” या ग्रंथाचे लेखनिक होते. कल्याण स्वामींची समाधी परंडा तालुक्यातील डोमगाव येथे असून तेथे समर्थ रामदास स्वामींनी सांगितला व कल्याणस्वामींनी लिहून घेतला त्या “दासबोध” या कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील सोनेरी व रूपेरी शाईने लिहलेल्या हस्तलिखित ग्रंथाची मूळ आद्य प्रत आजतागायत आहे.
कल्याणस्वामींनी इसवी सन १७१४ मध्ये परंडा येथे देह ठेवला. त्यांच्या पार्थिव देहाचे अंत्यसंस्कार डोमगाव येथे सीना नदीकाठी करण्यात आले. सीना नदीचे कल्याणस्वामींनी श्रमहरणी असे नामकरण करून त्याची आरतीही रचली आहे. कल्याणस्वामींच्या समाधीस्थळी डोमगाव येथे सुंदर असे लाकडी श्रीराम मंदिर असून आता त्याठिकाणी सीना कोळेगाव हा मोठा सिंचन प्रकल्प झाला असून या प्रकल्पाच्या “कल्याणसागर” जलाशयात हे मंदिर आहे. हे खूप छान, शांत, निसर्गरम्य आणि प्रेक्षणिय स्थळ आहे.
कल्याणस्वामींनी ७०० ओव्यांचे महावाक्य पंचीकरण हे प्रकरण आणि ध्रुवाख्यान(१४), श्रीरामदास(८), रुक्मिणीस्वयंवर(हिंदी-३४), श्रीशुकाख्यान(१८), संतमाळा(१०), सोलीवसुख(५०अभंग) व आणखी सहा प्रकरणे रचली आहेत. याशिवाय, ५ श्लोक, ८ आरत्या, ९७ पदे, ३ भूपाळ्या आणि ८२ चौचरणी ओव्या रचल्या आहेत. असे एकंदर कल्याणस्वामींचे विपुल साहित्य आहे.
अशा या महान अध्यात्मिक विभुतीचे नांव परंडा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस दिल्याबद्दल महाराष्ट्रातील महायुती शासन, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभातजी लोढा यांचे मनःपूर्वक आभार श्री. ठाकूर यांनी मानले आहेत.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – स्टार माझा न्यूज संपादक रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.