परंडा : पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा तालुक्यातील सोनारी येथील लहूबाई तीर्थ देवस्थानात 6 जानेवारी 2024 रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. भैरवनाथ गुरु गादी महंत पीर योगी शामनाथ महाराज यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, परंडा पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती नवनाथ जगताप, तसेच हभप बालाजी बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.



कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकरांच्या योगदानाचा गौरव करत पत्रकारितेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी पत्रकारांना समाजाचा चौथा स्तंभ मानून सामाजिक समस्या आणि लोकशाही मूल्ये बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी प्रमुख पत्रकारांचा सत्कार करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. पत्रकारिता ही लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असून, सत्य आणि पारदर्शकतेची गरज अधोरेखित करण्यात आली.

पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी पत्रकारांनी समाजहितासाठी काम करताना जबाबदारीने वागावे असे आवाहन केले. तर आमदार नारायण पाटील यांनी पत्रकारांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर सकारात्मक उपाययोजनांची हमी दिली.

या सन्मान सोहळ्यामुळे स्थानिक पत्रकारांच्या कार्याला प्रेरणा मिळाली असून, भविष्यातही असे कार्यक्रम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!