रणजीत भागडे डॉ ए पी जे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित.

Picture of starmazanews

starmazanews


(रा.गे.शिदे महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाचा संशोधक विद्यार्थी रणजीत भागडे यांच्या संशोधन कार्यास केले सन्मानित.
डॉ प्रकाश सरवदे यांनी केले मार्गदर्शन.) 

स्टार माझा न्युज परंडा प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे.

परंडा दि. 30 सप्टेंबर 2024 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथील वनस्पतीशास्त्र विभागाचा संशोधक विद्यार्थी रणजीत श्रीमंत भागडे यांना वनस्पतीशास्त्र मधील उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी सहारा चॅरिटेबल ट्रस्ट या राष्ट्रीय संस्थेने डॉ ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार देऊन सन्मानित केले.
       रणजीत भागडे हे गेल्या तीन वर्षापासून वनस्पती शास्त्रामध्ये संशोधन करत आहेत. त्यांनी डायव्हर्सिटी अँड रिस्पॉन्स ऑफ अरबीस्क्युलर मायकोरायझल  फन्जाय ऑन सम कॅश क्रॉप प्लांट्स ऑफ मराठवाडा .या विषयावर ते संशोधन करत आहेत. त्यांना वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख व संशोधन मार्गदर्शक डॉ प्रकाश सरवदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्कारामुळे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय बप्पा निंबाळकर संस्थेचे अध्यक्ष सुनील नाना शिंदे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी अभिनंदन व कौतुक केले. मराठवाड्यातील प्रमुख तीन पिकावर ऊस कापूस व केळी यावर ते संशोधन करत आहेत .त्यांच्या या यशस्वीतेमुळे उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने ,संशोधन मार्गदर्शक डॉ प्रकाश सरवदे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे , वरिष्ठ प्राध्यापक डॉ हरिश्चंद्र गायकवाड, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ अतुल हुंबे, प्रा डॉ सचिन  चव्हाण, गणित विभाग प्रमुख प्रा डॉ विद्याधर नलावडे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ अक्षय घुमरे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख,प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने ,कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे व महेश पडवळ यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेत कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!