स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा ( प्रतिनिधी) परंडा येथील श्री कल्याण स्वामी महाराज यांच्या मठानजीक च्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून पत्रे आडवे लावून मंदिराच्या वाहिवाटीस अडथळा निर्माण केला असल्याची तक्रार सोमवार गल्ली तील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी परंडा यांच्या कडे केली आहे दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले की कल्याण स्वामी याचा मठ परंडा येथे सुमारे ३०० वर्षापासूनच आहे सदरील मठात जुन्या काळापासून आजपर्यंत भजन कीर्तन जपतपाचे व इतर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते परंतु मंदिराच्या दक्षिणेकडील जागा ही मंदिराच्या कार्यक्रमाचे वेळी वापरण्यात येते आज पर्यंत ही जागा मठाच्या ताब्यात आहे सदरील जागेवर कोणाचे ही नावे नाही या मोकळ्या जागेस कुणी मालक नाही व नव्हता व आता ही नाही पाणी टंचाई च्या काळात नगरपालिके कडून कुपन नलिका खोदण्यात येऊन त्यासाठी रस्ता तयार करून दिला होता तो ही रस्ता बंद करण्यात आला आहे तो ही खुल्या करून द्यावा सदरील जागा ही नमूद मठाच्या ताब्यातील असल्यामुळे पुढे भविष्यात सदरील जागेमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे धार्मिक कार्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही व आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तेव्हा संबंधित अधिकारी यांनी या त्वरित लक्ष देऊन बंद केलेला रस्ता व केलेले अतिक्रमण काढून टाकावे व त्यांच्या वर कायदेशीर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी धाराशिव पोलीस अधीक्षक धाराशिव तहसीलदार परंडा पोलीस निरीक्षक परंडा यांना देण्यास आल्या आहेत शनिवारी दुपारी तहसीलदार परंडा यांनी घटनास्थळी भेट देऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करुन नगरपालिकेतील दप्तर ची पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे नागरिकांना आश्र्वासन दिले निवेदनावर २४ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.