परंडा शहरासह तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परडा, दि . १७ ( प्रतिनिधी ) – परंडा शहरासह तालुक्यात सोमवार दि १७ जून रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . शहरात चार ठिकाणी बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. ईदगा मैदानावर शहर काझी जफरअली मौलाना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. नमाज अदा झाल्यानंतर काझी यांनी बकरी ईदचे महत्व सांगितले.
  परंडा शहरात बकरी ईद या मुस्लिम बांधवांच्या सणानिमित्त मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेटी देवून बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरात ईदची नमाज  ईदगा मैदानावर, ख्वॉजा बद्रोद्दिन दर्गाह, पल्ला गल्लीती मस्जिद व मर्कस मस्जिद या ठीकाणी मुस्लिम बांधवांनी सोमवारी सकाळी अदा केली.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!