स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा दिनांक 10 जून 2024 परंडा शहरासह तालुक्यातील अनेक गावात सध्या पाऊस पडत आहे शेतकरी राजाने पेरणीपूर्व मशागत केली असून आता पेरणीची ओढ लागलेली आहे पेरणी पूर्वतयारी साठी बी बियाणे तसेच खत खरेदीसाठी तालुक्यातील बळीराजा परंडा शहरासह तालुक्यातील कृषी सेवा केंद्रावर गर्दी करत आहे
पेरणीसाठी बी बियाणे व खतांच्या मागणीत वाढ होत असल्यामुळे कृषी सेवा केंद्र चालक चढ्या दराने विक्री करत आहे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून प्रशासन गाफील असल्याचे चित्र दिसत आहे
तरी बळीराजाची होत असलेली पिळवणूक थांबविण्यासाठी आपण योग्य तो निर्णय घ्यावा तसेच शेतकऱ्यांची आडवणूक करून ज्यादा पैसे घेत असलेल्या कृषी केंद्र चालकांवर वचक बसावा म्हणून कठोरात कठोर कारवाई करावी
अन्यथा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आपण जबाबदार असाल असा इशारा देण्यात आला.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.