क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमित्त
अभिवादन.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

ऍट्रॉसिटी कायद्याला विरोध, शेतकऱ्यांना संपूर्ण वीजशुल्क व कर्ज माफ करावे, अण्णासाहेब पाटीलआर्थिक विकास महमंडळाला एक हजार कोटींचा निधी मिळावा, कर्नाटक सीमाप्रश्‍न सोडवावा आदींसह अन्यविषयांवर त्यांनी आंदोलने केली. वादग्रस्त लेखक “जेम्स लेन‘ प्रकरणी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपाईयांची बीड येथील सभा उधळली होती. केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे नेते लालकृष्ण अडवानी यांची रथयात्रा उमरगाचौरस्ता येथे अडविली होती. महाराष्ट्र-आंध्र प्रदेशच्या सीमेवरील बाभळी धरणाच्या प्रश्‍नावरील “छावा‘च्याआंदोलनाची आंध्र व केंद्र सरकारला दखल घ्यावी लागली होती. शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक करावे,अशी पहिली मागणी छावा संघटनेने केली होती. सलग 13 वर्षे अशी अनेक आंदोलने करून समाजाला जागे करण्याचेकाम त्यांनी केले;

ज्या ज्या वेळी महाराष्ट्राच्या मातीवर संकटे आली त्या त्या वेळी या मायभुमीने ती संकटे दुर करण्यासाठी योध्दापुत्र जन्माला घातले त्यातीलच एक आमचे प्रेरणास्थान मराठा अस्मितेचा बुलंद आवाज मराठ्यांचे क्रांतिसूर्यअण्णासाहेब जावळे पाटील.
अण्णासाहेब_जावळे_पाटील यांचा जन्म १६ एप्रिल १९७८ ला धाराशिव जिल्यातील मेंढा (घुगी) येथे एका शेतकरीकुटुंबात झाला.

5 फेब्रुवारी
मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमित्त छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने बिट अंमलदार बळीराम शिंदे यांच्या हस्ते परंडा येथे
विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी मराठवाडा संपर्कप्रमुख अमर भाई शेख जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे तालुका विधी सल्लागार Adv. महेश चोपडे बिट अंमलदार नितीन राजे गुंडाळे भुजंग अडसूळ साहेब तालुकाध्यक्ष सुधीर लटके संभाजी खैरे किरण वारे सिताराम सातपुते हरिभाऊ आदमिले ज्योतीराम घोगरे राजाभाऊ डावरे बाबुराव तनपुरे विजय काळे सुनील सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते
सदैव मराठा तरुणांचे प्रेरणास्थान राहिलेल्या क्रांतिसूर्य अण्णासाहेबांना मानाचा मुजरा
अण्णासाहेब स्वतःच्या प्रपंचाचा विचार न करता मराठा समाजासाठी व गोर गरीब जनतेसाठी अहोरात्र झटत राहिले समाजकार्यासाठी स्वतःतच आयुष्य वाहून घेतले, शेवटच्या क्षणापर्यंत गोरगरिबांसाठी अन मराठ्यांसाठी लढत राहिले, रसातळातील मराठा समाजात नवचैतन्य भरून क्रांतीची लाट निर्माण केली म्हणूनच त्यांना मराठ्यांचे क्रांतिसूर्य असे संबोधले जाऊ लागले.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!