परांडा येथे पालकमंत्र्याच्या हस्ते 100 खाटाचे उपजिल्हा रुग्णालय व 100 खाटाचे स्त्री रुग्णालयाचे भूमिपूजन.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परांडा येथे पालकमंत्री यांच्या हस्ते आज 100 खाटअचे उपजिल्हा रुग्णालय व 100 खाट चे स्त्री रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले.
87 कोटी खर्च करून य रुग्णालयांची इमारती तयार होणार आहे.
50 खटांचा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून शंभर खाटाचं करण्यात आल्याचे पालकमंत्री महणाले.
पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत पुढे म्हणाले की आरोग्य सेवा बळकट करण्यात शासन कमी पडणार नाही.तसेच निधीची कमतरताही पडू देणार नाही.येत्या एक वर्षात हे दोन्ही रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी सज्ज होतील असा मला विश्वास आहे. असेही डॉ.सावंत यावेळी म्हणाले.
डॉ.सावंत पुढे म्हणाले की या दोन्ही रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याठिकाणी रक्तपेढी, डायलासिस, आणि इतर रोगांवर उपचार केला जाईल.
पालकमंत्री पुढे म्हणाले की रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला काळजीपूर्वक तपासून उपचार देणे बंधनकारक राहील. आवश्यकता नसल्यास इतर ठिकाणी रेफर करण्यावर आळा घलण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार.
यावेळी विभागीय आरोग्य उपसंचालक डॉक्टर अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर इस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश हरिदास , तालुक्यातील आशा वर्कर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Recent Posts
error: Content is protected !!