विजयस्तंबाला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्री पासुनच लांबच लांबच रांगा, अनुयायांनची अलोट गर्दी

Picture of starmazanews

starmazanews


पुणे जिल्हा प्रतिनिधी नामदेव मेहेर
पुणे:- १ जानेवारी २०२४विजयस्तंभाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.तसेच विजय स्तंभ परिसरात आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे. सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.यावर्षी अधिक अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेऊन अधिक प्रमाणात सुविधा करण्यात आल्या आहेत.२९ ठिकाणी आरोग्य कक्ष उभारण्यात आले आहे. २० ठिकाणी फिरते दूचाकी आरोग्य पथक ५० रुग्णवाहिका ९० तज्ज्ञ डॉ.आणी २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त केलेले आहे खाजगी रुग्णालयात 1000 काटा आरक्षित करण्यात आले आहेत पुरेशा प्रमाणात औषधासाठी देखील ठेवण्यात आले आहे . स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता १५० पाण्याची टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या माता-भगिनींची काळजी घेण्यात आली असून एकूण पाच हिरकणी कक्ष उभारण्यात येत आहेत. तणादा माता व ज्येष्ठ महिला यांना तसेच त्यांच्या समावेत असलेले लहान बालकांसाठी विश्रांती तसेच बालकांच्या मनोरंजनाकरिता खेळणी साहित्य व खाऊ ठेवण्यात आले आहेत या ठिकाणी संत स्वतंत्र महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Recent Posts
error: Content is protected !!