स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड :- दि ७ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे ऐतिहासिक नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड शहरांमध्ये होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते डॉ. जब्बार पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वागता अध्यक्ष तर स्वागत समिती उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रमुख निमंत्रक म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत असतील अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, राजेश कुमार साकला, राजेंद्र बंग, संतोष रासने ,संतोष शिंदे, प्रणव जोशी, गौरी लोंढे, हर्षवर्धन भोईर ,आकाश थिटे, आणि नाट्य परिषदेचे सदस्य उपस्थित होते. भाऊसाहेब भोईर म्हणाले की पिंपरी चिंचवड शहरामध्ये शंभरावे नाट्यसंमेलन होत आहे. ही अभिमानाची आणि शहराच्या दृष्टीने गौरवशाली बाब आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हातसे ७९ व्या नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याचवेळी शंभरावे नाट्यसंमेलन पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरात व्हावे ही अपेक्षा होती. आणि त्याला स्वागत अध्यक्ष म्हणून शरद पवार साहेब यांना बोलवावे अशी मनोमनी इच्छा होती. आणि योगायोगाने या पूर्ण होत आहे तब्बल २७वर्षाच्या कालखंडात उदनमुख कलावंताच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्य संकुलन उभे करत आता आले नाही ही खंत आहे. मात्र, नियोजित नाट्यसमोर संमेलनाच्या निमित्ताने ही उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. देणगी स्वरूपामध्ये आर्थिक मदत घेऊन शहरात सुसज्ज असे नाट्य संकुल उभे करण्याचा पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचा आहे. असेही भोईर यांनी सांगितले मुख्य संमेलन मोरया गोसावी क्रीडांगणावर तर बालभारती विशेष व्यवस्था मुख्य संमेलन मोरया गोसावी क्रीडांगण काकडे पार्क चिंचवड येथे होणार असून भव्य नाट्यदिंडी व शोभा यात्रेने संमेलनास सुरुवात होईल.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.