एक महिन्यात पावनेतीन कोटींचा दंड, वाहतूक विभागाकडून कारवाईचा धडका;

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड :- वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने उभारला आहे. १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ३२हजार ७७५ वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्यावर २ कोटी७२ लाख रुपयांचा दंड आकारला आहे. शहरात वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीची निगडित होणाऱ्या अपराधांची संख्या देखील वाढू लागली आहे. वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी तसेच अपघात रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत २ कोटी ७२ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा दंड आकारला आहे. तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ६०७वाहन चालकांवर थेट खटले दाखल केले आहेत. तसेच अवजड वाहनांना प्रवेश बंदी केलेल्या मार्गावर प्रवेश करणाऱ्या ७ हजार ३ ७२ जड वाहनांवर कारवाई करण्यात आले आहे. महिन्याभरात एकूण ३२ हजार ७७५ वाहन चालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
*वाहतूक शाखेने केलेल्या कारवाया*
मोबाईल फोनवर बोलणे- ९३९, सिग्नल जप करणे १७२७, ट्रिपल सीट ३५५९, विना हेल्मेट २८८०, विदाऊट सिट बेल्ट २२२०, काळी काच १३९०, सायलेन्सर ८८४ वाहतुकीस अडथळा ८९६७ मधून वाहन चालवणे ३२२९

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!