स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा ,प्रतिनिधी.दिनांक 30 ऑक्टोबर 2023.छावाच्या कांदा अनुदानासाठीच्या आंदोलनाला यश
शेतकऱ्यांकडून फटाके फोडून जल्लोष
छावा संघटनेच्या वतीने 30 ऑक्टोबर रोजी लवकरात लवकर कांदा अनुदान वाटपाबाबत निवेदन देण्यात आले होते अन्यथा दिनांक 8 नोव्हेंबर रोजी शोले स्टाईल आंदोलन करण्याबाबत इशारा देण्यात आला होता. तेव्हापासूनच या शोले स्टाईल आंदोलनाची चर्चा तालुकाभर होती. त्यानुसार आज दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी छावा चे पदाधिकारी व शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असताना पोलीस प्रशासनाच्या वतीने पीएसआय घोंगडे साहेब कॉन्स्टेबल अडसूळ साहेब परंडा बीट अंमलदार गुंडाळे साहेब शेवाळे साहेब डिकुळे साहेब आदींनी कृषी उत्पन्न बाजार समिती, निबंध कार्यालय व छावाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणली परंतु प्रशासनाकडून चालढकलपणा केल्याने पदाधिकाऱ्यांचे समाधान न झाल्याने मराठवाडा संपर्कप्रमुख अमर भाई शेख जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे तालुकाध्यक्ष्ष सुधीर लटके, छावा शेतकरी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल गाढवे, शेतकरी पांडुरंग गरड संतोष बोराडे बापू धनवे महादेव गरड परमेश्वर लटके आदींनी पोलीस प्रशासनास चकवा देत बाजार समितीच्या मागच्या बाजूस असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर दुपारी बाराच्या सुमारास चढून जोपर्यंत कांदा अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर पडत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा घेतला, यावेळी दीपक गरड सीताराम सातपुते पृथ्वीराज पाटील हरिभाऊ आदमिले अभिलाश सूर्यवंशी शहाजी साळुंखे संदीप गरड राम आणिकर सचिन कडबने औदुंबरपाटीलप्रशांत गरड युवराज गरड श्री हरी शिंगारे अक्षय शिंगारेसौरव कोकाटे विशाल शेळके अशोक विनायक खैरे आदींसह शेकडो शेतकरी हजर होते
पोलीस प्रशासनाकडून विनंती करून देखील आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम होते. आंदोलकांकडून विविध प्रकारच्या घोषणा देण्यात येत होत्या.
शेवटी दुपारी तीनच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाल्याचा मेसेज आल्यानंतर आंदोलन सुखरूप पणे खाली उतरले.
कांदा अनुदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे या अनुदानामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.