चिंचवडमध्ये मराठा बांधव करणार निष्क्रिय मृत सरकारचा दशक्रिय विधी

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:-दि.३० ऑक्टोबर २०२३चिंचवड मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पिंपरी चिंचवड मधील मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. निष्क्रिय मृत सरकारचा मराठा बांधव उद्या दिनांक ३१ रोजी सकाळी११ वाजता चिंचवड मधील मोरया गोसावी समाधी घाट येथे दशक्रिया विधी करणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे ही माहिती दिली आहे. सतीश काळे यांनी म्हटले आहे की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ३० दिवसाची वेळ घेतली होती परंतु आज ४७ दिवस झाले तरी आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही गेल्या सहा दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची प्राकृति चिंताजनक होत चालली आहे. जर त्यांच्या आरोग्यास काही झाले तर मराठा समाज गप्प बसणार नाही आणि सरकारला हे आंदोलन परवडणार देखील नाही. सध्या राज्यात दररोज पाच ते सहा मराठा बांधवा आत्महत्या करीत आहेत. तरीही या मृत पावलेल्या शासनाला जाग येत नाही म्हणून या शासनाला जाग आणण्यासाठी निष्क्रिय शासनाचा निषेध म्हणून दशक्रिया विधी करून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती मराठा मोर्चा चे कार्यकर्ते सतीश काळे यांनी दिली आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!