www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
महाराष्ट्रातील एकमेव मराठा आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजासाठी उचलले धाडसी पाऊल : शहरासह तालुक्यातील अनेक मराठ्यांच्या कुणबी नोंदी असलेले पुरावे काढले शोधून!
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लाखोंच्या संख्येने मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली. या दीर्घ लढ्यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमावे लागले. राजकीय स्तरावरती सत्ताधारी आणि अपक्ष सर्व नेते मंडळी चिडेचुप असताना, बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी धाडसाने पुढाकार घेऊन, बार्शी नगरपरिषद आणि बार्शी तहसील कार्यालया मधील दप्तर चाळून अनेक पुरावे उघडकीस आणले आहेत. बार्शी शहरासह तालुक्यातील अनेक मराठा समाजातील व्यक्तींचे कुणबी नोंदी असलेले पुरावे शोधून काढले आहेत. यामध्ये 1877 पासून अनेक मराठा समाजातील अनेकांच्या कुणबी म्हणून नोंदी असल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले आहे. सदरील प्रकरणी सखोल तपासणी आणि चौकशी करून सर्व ठोस पुराव्याणीशी मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
![starmazanews](https://secure.gravatar.com/avatar/4fda7f8e27869db8a392615e0d2c6001?s=96&r=g&d=https://starmazanews.com/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.