स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- ताथवडे दि.९ ऑक्टोबर २०२३ टँकर मधून अवैधरित्या सिलेंडर मध्ये गॅस भरत असताना लागलेल्या आगीत सलग लागोपाठ नऊ सिलेंडरचा स्फोट झाले. यामुळे परिसरातील सोसायटी धारकांमधील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. स्फोटामुळे आगीचे लोळ आणि धुराचे लोट उठले. आगीत टॅंकर सह तीन स्कूल बस जळून खाक झाल्या. मुंबई बेंगलोरु महामार्गावर ताथवडे येथील जीएसपीएम महाविद्यालयाजवळ रविवारी दिनांक ८ रात्री ११:०० च्या सुमारास ही घटना घडली. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार जीएसपीएम महाविद्यालया जवळील मोकळ्या जागेत गॅस सिलेंडर असलेला एक टँकर होता या टँकर मधील गॅस अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर मध्ये भरण्याचे काम सुरू होते. या गॅस चा आगीशी संपर्क आल्याने आग लागली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले सर्वजण पळून गेले मात्र क्षणा अर्थात अग्नीने रौद्ररूप धारण केले. तिथे असलेल्या तब्बल नऊ गॅस सिलेंडरचा एका मागोमाग एक असा स्फोट होत गेला. त्यामुळे तेथील तीन स्कूल बसनेही पेठ घेतला घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळावले घटनेची माहिती मिळताच पोलीस उपयुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे, यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान परिसरातील सोसायटीमधील नागरिकांमध्ये स्फोटाच्या आवाजाने घबराट पसरली होती. यावेळी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.महिपाल चौधरी (रा. पुनावळे), राहुलकुमार राजदेवराम (रा. थेरगाव), मोहम्मद रशीद मोहम्मद नसीम (रा. उत्तर प्रदेश), चंद्रकांत महादेव सपकाळ (रा. ताथवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भारत माने यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
