स्टार माझा न्युज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.ता ८ एप्रिल २०२६
परंडा तालुक्यातील ऑट्रॉसिटी प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड समोर आली आहे. बावची येथील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने दि. ७ एप्रिल रोजी फेटाळून लावला आहे.
दि २६ मार्च रोजी थिटे याच्यावर परंडा पोलिस ठाण्यात ऑट्रासिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा पासुन आरोपी फरार आहे ,
या प्रकरणातील फिर्यादी उमेश भास्कर सोनवणे यांनी “आरोपीला तात्काळ अटक करावी” अशी जोरदार मागणी केली आहे. त्यामुळे आता परंडा पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुधी शिवारातील शेतकरी उमेश सोनवणे यांच्या शेता
शेजारील रामचंद्र विक्रम थिटे यांनी जातीय द्वेषातून सोनवणे यांच्या शेतातील पाइपलाइन, बोरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड करून सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान केले. इतकेच नव्हे, तर
“तुला इथे शेती करू देणार नाही” अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ
केली होती ,
या प्रकारानंतर दि. २६ मार्च रोजी परंडा पोलीस ठाण्यात आरोपी रामचंद्र विक्रम थिटे यांच्या विरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ऑट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला होता ,
आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी परंडा जिल्ह्या सत्र न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे ,
फिर्यादी च्या वतीने शासकीय विशेष अभियोगता अँड गाडे , अँड निकाळजे , अँड बी .बनसोडे , यांनी यूक्तीवाद केला ,
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










