परंडा शहरात श्री हनुमान रथ उत्सव मिरवणुक मोठ्या उत्साहात साजरी.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा दिनांक 6 शहरात श्री हनुमान रथ उत्सव मिरवणुक सालाबाद  प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पारंपारीक पद्धतीने दिनांक ५ एप्रिल रविवार सायंकाळी ६ वाजता  हालगी लेजीम बँड पथकासह मोठ्या उत्साहात श्री लाल हनुमान रथ मिरणुक काढण्यात आली दिनांक ५ एप्रिल सायंकाळी ५ वाजता रथाच्या नाड्याचे मानकरी चंद्रकात ( काका) आलबते माळे गल्ली यांच्या घरुन वाजत गाजत नाडा आणण्यात आला  सायंकाळी ६ वाजता  श्री हनुमान भव्य रथाची  पूजा धुप आरती प.पु शिवचणानंद सरस्वती महाराज ( चिंचगाव टेकडी   व महंत तुकोजीबुआ ( श्रीक्षेत्र तुळजापूर महंत योगी शामनाथ बाबाजी महाराज श्री क्षेत्र सोनारी श्री संजय महाराज पुजारी श्रीक्षेत्र सोनारी  व ह भ प धर्मराज दादा सामनगावकर  ह भ प दत्ता महाराज हुके यांच्या शुभ हस्ते पुजा आरती करण्यात आली यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर   शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख रणजीत पाटील  परंडा पोलिस . स्टेशनचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले  उपनगरध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर  माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्धीवाल युवा नेते विश्वजित पाटील नगसेवक मदनसिंह सद्‌घीवाल ।परंडा व्यापारी संघाचे उपाधपक्ष हनुमंत विटकर अदि मान्यवर उपस्थित होते  या रथ मिरवणुकीला सुरुवात झाली हि रथ मिरवणुक बँड पथक लेजीम हालगी    यांच्यासह बोलो बजरंग बली जय या जय घोषाने परंडा नगरी दुमदुमुन गेली मोठ्या भक्ती भावाने भावीक भक्ताने रथ ओढण्यासाठी गर्दी केली होती हि रथ मिरवणुक लाल हनुमान मंदिरापासून मंडई पेठ मार्गे जयभवानी चौक मार्गे भवानी शंकर मंदिर येथे काळ मारुती मंदिरत  सायंकाळी १० वाजता  हा रथ भेटायला येते येथे रथ पोहचल्या नंतर भवानी शंकर मंदिराचे विश्वस्त पुजारी किशोर महाराज बैरागी यांच्या हस्ते . मानाची आरती करण्यात आली  व प्रसादाचे वाटप करण्यात आले व रथ मार्गस्थ होवुन  लाल हनुमान मंदिर येथे पोहचला व आरती करून भावीक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आलेहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक सकल हिंदू समाज परंडा व श्री हनुमान रथोत्सव समिती परंडा यांनी पुढाकार घेतला होता

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!