स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : ०३ एप्रिल २०२६.
कुर्डुवाडी नाका चौकाचे ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम चौक’ म्हणून सुशोभीकरण करण्याची मागणी
परंडा – प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा शहरातील कुर्डुवाडी नाका हा अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा चौक मानला जातो. या चौकाचे ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम चौक’ या नावाने सुशोभीकरण करावे, अशी एकमुखी मागणी शहरातील नागरिकांनी केली असून यासंदर्भातील लेखी निवेदन परंडा नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांना देण्यात आले आहे.
निवेदनातील मागणी
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,
– कुर्डुवाडी नाका हा शहराचा प्रमुख प्रवेशद्वार असून वाहतुकीची मोठी गर्दी असते.
– या चौकाला आधुनिक, आकर्षक आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुशोभीकरणाची गरज आहे.
– देशाचे माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने हा चौक विकसित केल्यास शहराची शान वाढेल.
शहरातील नागरिकांची एकमुखी स्वाक्षरी मोहीम
या निवेदनावर खालील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत :
तनवीर अब्रार मुजावर, तय्यब नसिर अन्सारी, रईस हस्तगिर जहागिरदार, जलील ताहेर सय्यद, नाजेन नोमान मुजावर, आमजद रसोद्दीन मुजावर, जमाल निजामुद्दीन मुजावर, दिलीप किसनराव रणभोर, बबलू जब्बार कुरेशी यांसह इतर अनेक नागरिकांचा समावेश आहे.
नागरिकांनी आशा व्यक्त केली आहे की नगरपरिषद ही मागणी सकारात्मकपणे मान्य करून चौकाचे काम तातडीने हाती घेईल.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.








