परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने ,परांडा दिनांक २६ मार्च परंडा येथे श्री रामनवमीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी च्या वतीने भव्य भगवा ध्वज यात्रा..!
परंडा शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक येथे मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब, युवा नेते मल्हार दादा पाटील, जि.प. सदस्य धनंजय दादा सावंत यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांच्या चरणी वंदन करून या दिव्य सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. हा क्षण केवळ रॅलीचा प्रारंभ नव्हता, तर श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचा साक्षीदार ठरला.

“जय श्रीराम” च्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आणि प्रत्येकाच्या मनात श्रद्धेचा दिवा प्रज्वलित झाला. या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करुन पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, परंडा न.प. उपनगराध्यक्ष श्री. समरजीतसिंह ठाकूर, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. अरविंद रगडे, शहराध्यक्ष श्री. उमाकांत गोरे, श्री. गौतम लटके, श्री. जयदेव गोफणे, श्री. धनाजी गायकवाड, श्री. तानाजी पाटील, सौ. शैलाभाभी ठाकूर, सौ. ज्योतीताई सावंत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. प्रियंका क्षीरसागर, पंचायत समिती सदस्य सौ. मोनिका पाटील, सौ. सुप्रिया रगडे, शहराध्यक्षा सौ. ज्योतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला ही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










