स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक :20 मार्च
🔹 स्पर्धा परीक्षेत यशाचा मानबिंदू ठरतंय राज कोचिंग
परंडा शहर व ग्रामीण भागात शालेय स्पर्धा परीक्षेचा केंद्रबिंदू म्हणून राज कोचिंग क्लासेस नावारूपाला येत आहे. विद्यार्थ्यांच्या यशामुळे या क्लासेसची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे.
🔹 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात
राज कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश मिळविल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
🔹 नवोदय व सैनिक स्कूलमध्ये निवड
या परीक्षेत शौर्य रेश्मा समाधान खुळे याची जवाहर नवोदय विद्यालय, तुळजापूर येथे निवड झाली. तर अथर्व रूपाली महेश नलवडे याने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश मिळविले.
🔹 ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यामध्ये प्रणिती सोनवणे (९१.२५%), शौर्य खुळे (९०%), अथर्व नलवडे (९०%), भार्गवी शिंदे (८६.२५%), आयुष माळी (८५%), श्रेया जाधव (८५%), राजवर्धन कुकडे (८३.७५%), रणजित सोनवणे (८३.७५%), अभिराज चौधरी (८३.७५%) व आराध्या मिस्कीन (८०%) यांचा समावेश आहे.
🔹 गणेश कुकडे यांचे मार्गदर्शन
यावेळी अध्यक्षीय भाषणात गणेश कुकडे यांनी “राज कोचिंग क्लासेस हा स्पर्धा परीक्षेचा केंद्रबिंदू व मानबिंदू ठरत आहे,” असे सांगत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच इतर विद्यार्थ्यांनीही प्रेरणा घेऊन उज्ज्वल यश संपादन करावे, असे आवाहन केले.
🔹 संचालक सुजित देशमुख यांचाही सन्मान
पालकांच्या वतीने राज कोचिंग क्लासेसचे संचालक सुजित देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला समाधान खुळे, रेश्मा खुळे, सदानंद देशमुख, महादेव गिरी, नीलम गिरी, महेश नलवडे, रूपाली नलवडे, महेश शिंदे, अमोल भोजने, कृष्णा देशमुख यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
🔹 सूत्रसंचालन व आभार
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा परिषद शिक्षक सदानंद देशमुख यांनी केले.
📞 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









