चिमण्या आपल्या परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत – डॉ शहाजी चंदनशिवे.

Picture of starmazanews

starmazanews


(शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात जागतिक चिमणी दिवस साजरा.)
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परांडा दि. 20 मार्च 2026
धाराशिव : चिमण्या हा आपल्या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे त्या कीटकनाशक म्हणून काम करतात आणि अन्नसाखळीत त्या महत्त्वाची भूमिका बजावतात असे मत डॉ शहाजी चंदनशिवे यांनी जिल्ह्यातील परांडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे  शिंदे महाविद्यालयात जागतिक चिमणी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी वरील मत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि चिमणी संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात चिमणीचे पर्यावरणातील महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, आधुनिक शहरीकरण, प्रदूषण आणि बदलती जीवनशैली यामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. त्यामुळे प्रत्येकाने चिमणी संरक्षणासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य डॉ. विद्याधर नलवडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. तसेच चिमण्यांसाठी घरटी तयार करणे, पाण्याची सोय करणे यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी चिमण्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय करून  प्रांगणामध्ये काही घरटी तयार केली. यावेळी ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभणे प्रयोगशाळा सहाय्यक जयवंत देशमुख उपस्थित होते .
या कार्यक्रमात वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा डॉ. सचिन चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे अभिनंदन केले.
यावेळी वरिष्ठ पदवी व पदव्युत्तर विभागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, चिमणी संरक्षणासाठी सकारात्मक संदेश दिला गेला.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!