सुरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादित जमिनींना समृद्धी महामार्गप्रमाणे मावेजा द्या – मा.आ.राहुल मोटे.

Picture of starmazanews

starmazanews



परांडा मतदारसंघातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित; कमी दरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
स्टार माझा न्यूज, परांडा (प्रतिनिधी) गोरख देशमाने – दिनांक : 12 मार्च 2026
सुरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी जमीन संपादन
परांडा विधानसभा मतदारसंघातून जाणाऱ्या सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. या महामार्गामुळे विकासाची नवी संधी निर्माण होणार असली तरी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याबाबत मोठी नाराजी व्यक्त होत आहे.
अनेक गावांतील शेतकरी बाधित
या महामार्गासाठी कुंभेफळ, कांदलगाव, पिस्तमवाडी, राजुरी, घारगाव, सिरसाव, रोहकल, अनाळा यासह अनेक गावांमधील शेतजमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला मावेजा अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्याची भरपाई होणे आवश्यक आहे.


समृद्धी महामार्गप्रमाणे मोबदल्याची मागणी
बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व परांडा मतदारसंघाचे मा.आमदार राहुल (भैय्या) मोटे यांनी या प्रश्नावर पुढाकार घेतला आहे. समृद्धी महामार्गासाठी ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना मावेजा देण्यात आला, त्याच धर्तीवर सुरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादित जमिनींचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
या संदर्भात मा .आमदार राहुल मोटे यांनी धाराशिव जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. संबंधित शेतकऱ्यांना योग्य दराने मावेजा मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंतीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा
सुरत–चेन्नई महामार्गामुळे विकासाला चालना मिळणार असली तरी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!