(12 आस्थापनाचे प्रतिनिधी
310 पदासाठी मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया करणार)
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.परंडा दि. 10 मार्च 2026 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन. पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छुक उमेदवारासाठी दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा महाविद्यालयात दिनांक 13 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.

खाजगी 12 स्थापनेचे प्रतिनिधी 310 पदासाठी पात्र व नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया करणार आहेत. तरी आजी-माजी विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी मुलाखतीस येताना शैक्षणिक पात्रतेचे सर्व प्रमाणपत्र अनुभवाचे प्रमाणपत्र स्वतःचा शैक्षणिक बायोडाटा या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी सह महाविद्यालयात उपस्थित राहून जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजय गुरव सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केले आहे .रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने या रोजगार मेळाव्याचे समन्वयक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ अरुण खर्डे प्रा डॉ किरण देशमुख यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केले आहे.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










