फडणवीसांच्या शेजारी स्थान; राजेंद्र राऊतांचा सोलापूर राजकारणातील दबदबा स्पष्ट!

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : ५ मार्च २०२६
बार्शीचे राजेंद्र राऊत पुन्हा चर्चेत; फडणवीसांच्या शेजारी बसल्याने राजकीय संकेत!
स्टार माझा न्यूज मुंबई प्रतिनिधी – दिनांक 5 मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र या बैठकीत सर्वाधिक लक्ष वेधले ते बार्शीचे माजी आमदार Rajendra Raut यांनी.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शेजारी राजेंद्र राऊत
बैठकीदरम्यान Rajendra Raut हे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अगदी शेजारी बसलेले दिसून आले. यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे असलेले वजन पुन्हा एकदा स्पष्ट झाले. राजकीय वर्तुळात राजेंद्र राऊत हे सोलापूर जिल्ह्याचे ‘किंगमेकर’ असल्याचे या बैठकीतून सिद्ध झाले, अशी चर्चा रंगू लागली आहे.
जिल्हा परिषद विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने एकहाती सत्ता मिळवली. या घवघवीत यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व नेत्यांचे अभिनंदन केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर बैठक
या बैठकीला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री Jaykumar Gore यांच्यासह आ. सचिन कल्याणशेटी, आ. समाधान अवताडे, मा. आ. राजन पाटील, मा. आ. दिलीप माने, मा. आ. राम सातपुते, आ. यशवंत माने, रणजीत शिंदे, प्रा. शिवाजी सावंत सर, चेतनसिंह केदार, रश्मी दीदी बागल आदी मान्यवर उपस्थित होते. ही बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर पार पडली.
बार्शीच्या विकासकामांवर सकारात्मक चर्चा
बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. तसेच बार्शी तालुक्यातील उजनी उपसा सिंचन, उजनी-बार्शी समांतर जलवाहिनी, श्री भगवंत तीर्थक्षेत्र विकास आराखडा, MIDC, बस स्थानक, क्रीडा संकुल, साठवण तलाव, सिंचन योजना अशा महत्वाच्या योजनांना गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.


बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!