स्टार माझा न्यूज परंडा: प्रतिनिधी गोरख देशमाने – परंडा नगरपरिषदची सर्वसाधारण सभा दि. ४.३.२०२६ रोजी आयोजित केली होती. या सर्वसाधारण सभेत जनशक्ती नगर विकास आघाडी च्या वतीने अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. यात दोन दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या कर वसुली ठेकेदाराने व्यापारी तसेच शेतकरी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून कराची रक्कम जमा कर अशी धमकी दिली होती. हाच विषय जनशक्ती नगर विकास आघाडीने सभागृहात झालेल्या आठवडी बाजार व दैनंदिन बाजार लिलाव ठेका उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक यांनी बहुमताने फेटाळून लावला.
सदर विषयाच्या अनुषंगाने ठेकेदाराकडून आठवडी बाजार व दैनंदिन बाजारामध्ये किरकोळ व ठोक विक्रेत्यांकडून व शेतकऱ्यांकडून कर संकलन करताना नियमानुसार नगरपालिकेने निश्चित केलेली रक्कम वसूल न करता जास्तीचे पैसे वसूल करणे तसेच विक्रेत्यांना व शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी करणे अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या.
दि. ४.३.२०२६ रोजी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदर ठेका नगरपालिकेने ठेक्याचा लिलाव न करता नगरपरिषदेच्या कराची रितसर रकमेची पावती देऊनच आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच कराची वसुली करण्यात यावी अशी मागणीही जनशक्ती नगर विकास आघाडी च्या वतीने मुख्याधिकारी यांना करण्यात आली.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










