स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने – दिनांक 27 परंडा बसस्थानकात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रमुख पाहुणे जेष्ठ समाजसेवक तथा साहित्यकार तु.दा गंगावणे, पञकार प्रमोद वेदपाठकसाहेब फारुख भाई शेख, विजयकुमार मेहेर , प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किरण शहा,आगार प्रमुख श्री बालाजी मुळेसाहेब, वाहतूक निरीक्षक श्री गोरख खराटेसाहेब, सहायक कार्यशाळा अधिक्षक श्री संजय कांबळे साहेब वाहतूक नियंत्रक श्री संजय कदम साहेब, लिपिक रामलिंग शिवलकर, दिपक चैतन्य, नवनाथ नलावडे, रवींद्र चव्हाण उपस्थित होते. मराठी भाषा हि सर्व संपन्नता व अभिजात भाषा असून समाजात या भाषेचा जास्तीत जास्त प्रमाणात अंगीकार करावा व मराठी साहित्य क्षेत्रात युवकांनी योगदान दिले पाहिजे असे आवाहन श्री गंगावणे सर यांनी केले. सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषा हि सक्तीची आहे परंतु ती उस्फुर्त प्रतिसाद देऊन वृद्धींगत करण्यासाठी स्वयंप्रेरणेने मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात वापर केला पाहिजे असे मत आगार प्रमुख बालाजी मुळेसाहेब यांनी मांडले. मराठी भाषेतील विविध अलंकारिक काव्यांचा उल्लेख करत वाहतूक नियंत्रक श्री कल्याण कुंभार यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच प्रवाशांचे आभार मानले
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









