स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : २६ फेब्रुवारी २०२६.
कष्टकरी घरातून उजळली गुणवत्ता
परांडा तालुक्यातील सिरसाव येथील जिल्हा परिषद प्रशालेने एन.एम.एम.एस परीक्षेत चांगले यश मिळवत गावाचा मान उंचावला आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत पात्र ठरलेले सर्व १२ विद्यार्थी हे शेतकरी व मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील आहेत. आई-वडील दिवसभर शेतीत व मजुरीत राबत असताना त्यांच्या लेकरांनी अभ्यासातून ही गुणवत्ता सिद्ध केली आहे.
१२ विद्यार्थ्यांची यशस्वी झेप
मर्यादित परिस्थितीतही या शाळेतील १२ विद्यार्थी पात्र ठरले असून त्यांनी मेहनतीच्या जोरावर आपले वेगळेपण दाखवून दिले.
मुलींनी घेतली आघाडी
या निकालात विशेष बाब म्हणजे पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. ग्रामीण भागात मुली शिक्षणात पुढे येत असल्याचा हा सकारात्मक संकेत मानला जात आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची नावे
या परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
समृद्धी मारुती जाधव – 113
दिया दिपक काकडे – 102
मानसी अविनाश गावकरे – 92
अक्षरा बिरमल देवराम – 85
जानवी शिवाजी देवराम – 84
विश्वजीत रमेश चोबे – 84
वैभवी हनुमंत देवराम – 82
वैष्णवी प्रकाश घाटुळे – 82
वैष्णवी बाळासाहेब वायकुळे – 81
राज बालाजी मिसाळ – 77
आर्या अभिमान चोबे – 72
कल्याणी बिरमल चोबे – 72
आई-वडिलांच्या घामाबरोबर शिक्षकांची साथ
या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी शेती व मजुरी करत संसार चालवत आपल्या लेकरांना शिक्षणाची गोडी लावली, तर दुसरीकडे शाळेतील शिक्षकांनीही अथक परिश्रम घेत वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने अभ्यासाची तयारी करून घेतल्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगितले जात आहे.
शिक्षकांचे श्रम ठरले आधार
या सर्व पात्र विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










