महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन.एम.एम.एस परीक्षेत घवघवीत यश

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : २६ फेब्रुवारी २०२६.

निकालात बार्शीचा दबदबा
मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या एन.एम.एम.एस परीक्षेच्या निकालात महाराष्ट्र विद्यालय बार्शीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातून एकूण २४६ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.
१८५ विद्यार्थी उत्तीर्ण
या परीक्षेत तब्बल १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल लक्षणीय ठरला आहे. यामध्ये १०० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८५ इतकी आहे.
आदित्य म्हेत्रे प्रथम
या परीक्षेत चि. आदित्य दिपक म्हेत्रे या विद्यार्थ्याने १५३ गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन
या यशामागे श्री. सचिन देशमुख, श्री. सुरेश डिसले, श्री. संग्राम देशमुख व श्री. सुजित लोखंडे यांचे विद्यार्थ्यांना लाभलेले मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
मान्यवरांकडून अभिनंदन
या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. श्री. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष मा. श्री. नंदनजी जगदाळे, सचिव तथा शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. पी. टी. पाटील, सहसचिव मा. श्री. अरुणजी देबडवार, खजिनदार मा. श्री. जे. सी. शितोळे, शाळा समिती सदस्या मा. डॉ. सौ. मीराताई यादव, सदस्य मा. श्री. शेळवणे बापू, मुख्याध्यापिका श्रीमती के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक श्री. आर. बी. सपताळे, पर्यवेक्षिका श्रीमती एन. बी. साठे, पर्यवेक्षक श्री. मदने के. जी. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!