स्टार माझा न्यूज, परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने (प्रतिनिधी) – दिनांक : 26 फेब्रुवारी 2026
नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी जनशक्ती नगर विकास आघाडी पुढे
परंडा शहरातील नागरिकांना नियमित पिण्याचे पाणी मिळावे, तसेच विविध प्रभागातील पथदिवे, आरोग्य सेवा व परिसर स्वच्छता व्यवस्थित व्हावी यासाठी जनशक्ती नगर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक आता पुढाकार घेत आहेत.
रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार
शहरातील नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागावीत या उद्देशाने नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, गटनेते, प्रतोद, सभापती व सर्व जनशक्ती नगर विकास आघाडीचे 12 नगरसेवक एकत्रितपणे काम पाहणार आहेत.
कार्यालयात पदाधिकारी उपलब्ध
उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर, पाणीपुरवठा विभाग सभापती रमेशसिंह परदेशी, बांधकाम व मागासवर्गीय समिती सभापती सौ. रत्नमाला राहुल बनसोडे, महिला व बालकल्याण सभापती परवीन, नगरसेवक मदनसिंह सद्धीवाल, गटनेते अनिल शिंदे, नगरसेवक दहेलुज जकोरिया, सत्तार पठाण, डॉ. अब्बास मुजावर, इस्माईल कुरेशी, सोमनाथ आलबते, मन्नान बासले व अविनाश विधाते हे सर्व मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध राहणार आहेत.
नागरिकांना संपर्काचे आवाहन
शहरातील सर्व नागरिकांनी आपली कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जनशक्ती नगर विकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.








