विविध कला गुणदर्शन कार्यक्रमातून मराठी शाळा वाचवा हा प्रभावी संदेश..
स्टार माझा न्यूज तुळजापूर प्रतिनिधी दिनांक 21- इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे वाढते आकर्षण आणि मराठी शाळांमधील घटती विद्यार्थी संख्या* या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कला गुण दर्शनाच्या कार्यक्रमातून मराठी शाळा वाचवा असा कळकळीचा आणि प्रभावी संदेश दिला. आपल्या अष्टपैलू सादरीकरणातून या चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली असून मराठी माध्यम व शाळांचा अभिमान जागृत केला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काटगाव येथे दि.21/02/2026 रोजी शाळेच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलन व बालकला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, मुलांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे,आणि त्यांच्यात मराठी भाषेबद्दल सार्थ अभिमान निर्माण व्हावा हा या स्नेहसंमेलनाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे सरपंच श्री. अशोक माळी, प्रमुख पाहुणे श्री.सुनील रोकडे, श्री.कचरु सगट, काटगाव गणाचे नुतन पंस सदस्य श्री. बालाजी शिंदे, मंगरुळ बीटचे विस्तार अधिकारी श्री. मल्लीनाथ काळे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विलास राठोड, उद्योजक श्री. इरफान पठाण, श्री. तानाजी बेटकर, तुळजापूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री. नागेश स्वामी, नांदुरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. संजय वाले, अपसिंगा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.मोहन भोसले, श्री.नागनाथ वडणे, श्री. गोरे, श्री.महामने, आदी मान्यवर उपस्थित होते.

देवा श्रीगणेशा या गीतातुन गणपती स्तवनाने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली. शाळा मराठी आमची शाळा मराठी, छत्रपती शिवरायांचा पराक्रमाचा जागर, आई तुळजाभवानीचे गोंधळ गीत, कव्वाली, भीम गीत, लावणी, बालगीते, नाटिका, शेतकरी गीत, भारुड, याबरोबरच आकर्षक वेशभूषा, मनमोहक विद्युत रोषणाई, सुंदर नृत्याविष्कार अशा बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण प्रेक्षकांची मने जिंकली. मान्यवर, शिक्षणप्रेमी नागरिक, पालक, ग्रामस्थ यांनी भरभरून दाद देत बक्षिसांचा वर्षाव करत तब्बल *एक लाख पंचवीस हजार रुपयांचे आजपर्यंतच्या शाळेच्या इतिहासातील विक्रमी बक्षीस* शाळेला प्राप्त झाले.
*लोककला संस्कृतीचे दर्शन-:*
*लोककला -:* गोंधळ, भारुड,लावणी पोवाडा, गवळण, अभंग.
*विविधता :-* कव्वाली देशभक्तीपर गीते शेतकरी गीत,कोळीगीत, भीम गीत. *विशेष आकर्षण* :- माझी मैना गावाकडे राहिली, दैवत छत्रपती, आजी व नात ही नाटिका
*सामाजिक प्रबोधन:-* विविध नाट्यरूपकांच्या माध्यमातून स्री-पुरुष समानता, बेटी बचाओ- बेटी पढाओ, धरर्मनिरपेक्षता आदी सामाजिक विषयावर प्रकाश टाकला.
*सहभागी बालकलाकार*- श्रेया कोलते, वैष्णवी माळी, पृथ्वीराज हजारे, नर्गीस, आलीया यासह 240 बालकलाकारांचा सामावेश..
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सोमनाथ माळी सदस्य श्री.सोमनाथ कोरे श्री.सल्लाऊद्दिन घाटवाले,श्री. दिलीप कोलते श्री.सूर्यकांत कांबळे श्री.बालाजी बेटकर, श्री.महेश माळी, श्रीम. शितल घोडके, श्रीम. लक्ष्मी सोनटक्के, श्रीम राऊत, श्रीम. शुभांगी कोलते श्रीम. रंजना बेटकर, श्रीम. भाग्यश्री कोरे, श्री वैशाली चादरे श्रीम.अरुणा तेलं, श्रीम.प्रतिभा हजारे, शापोआ मदतनीस प्रशांत गोरसे, श्री. बिभीषण लोहार, श्री.गौतम सोनवणे प्रिन्स डिजिटल यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार मुख्याध्यापक श्री. राजेंद्र लोहार तसेच प्रभावी सूत्रसंचालन श्री. महादेव गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षिका श्रीम. ज्योती सोनावणे श्रीम. सुनिता भक्ते, श्रीम. द्रौपदी लांडगे सहशिक्षक श्री विजयकुमार गायकवाड, श्री दिलीप लोंढे, श्री नितीन वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









