रा गे शिंदे महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी.

Picture of starmazanews

starmazanews

संत गाडगेबाबांनी समाजातील वाईट प्रथा, अंधश्रद्धा आणि असमानता दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला

स्टार माझा न्यूज परांडा  प्रतिनिधी गोरख देशमाने दि.23 फेब्रुवारी 2026.
संत गाडगेबाबांनी समाजातील वाईट प्रथा, अंधश्रद्धा आणि असमानता दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. असे प्रतिपादन डॉ शहाजी चंदनशिवे यांनी महाविद्यालयात आयोजित केलेल्या संत गाडगेबाबा जयंती निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले



     शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे  शिंदे महाविद्यालय परंडा येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर महेशकुमार माने यांचे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बलभीम महाविद्यालय बीड येथील डॉक्टर योगेश भराटे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ विद्याधर नलवडे डॉ अक्षय घुमरे डॉ अमर गोरे पाटील डॉ प्रशांत गायकवाड डॉ संभाजी गाते डॉ सचिन चव्हाण राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ दीपक तोडकरी प्रा जगन्नाथ माळी उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्राध्यापक  कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या स्वच्छता, सामाजिक समता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणप्रसार या कार्यांची महती विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितली. “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश आजच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. चंदनशिवे यांनी सांगितले की, संत गाडगेबाबांनी समाजातील वाईट प्रथा, अंधश्रद्धा आणि असमानता दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी शिक्षण आणि नैतिक मूल्ये यांना सर्वोच्च स्थान दिले. आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे आचरण करून समाज परिवर्तनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
व स्वच्छता अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ दीपक तोडकरी यांनी केले  सूत्रसंचालन डॉ सचिन चव्हाण यांनी केले.  तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा जगन्नाथ माळी यांनी मानले.
संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.  सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ केला.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!