स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
दि. 5 फेब्रुवारी 2026
जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला परंडा येथे बारावी दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक खतीब ए ए तर प्रमुख पाहुणे म्हणून अमीनाबी अबरार मुजावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीच्या विद्यार्थ्यांनी केले. या प्रसंगी नगरसेविका परंडा, व मौलाना निजाम शेख, तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली .
दखनी समीना, बांगी जमील .लोधवाल नितीन . शिंदे महेंद्र, चंदनशिवे अंजली, पल्ला अमरीन यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली , दरवर्षीप्रमाणे दखनी समिना मॅडम कडून आदर्श विद्यार्थी निवडून त्यांना बक्षीस देण्यात आले.खतीब यांनी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. व सर्वांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









